Home Breaking News चार वर्षांवरील लहान मुलांनाही आता ‘हेल्मेटसक्ती’; असे आहेत नियम, असा राहील दंड!

चार वर्षांवरील लहान मुलांनाही आता ‘हेल्मेटसक्ती’; असे आहेत नियम, असा राहील दंड!

89

 

शिल्पा पाटील
मुंबई – दुचाकी अपघात त्यात जाणारे लहान मुलांचे बळी आणि लहान मुलांचा दुचाकीवरून धोकादायक पद्धतीने प्रवास या सर्व बाबी लक्षात घेता आता लहान मुलांना दुचाकी वाहनावर येत असताना काही नियम पाळावे लागणार आहेत या नियमांचे पालन केले नाही तर दंडात्मक तरतूद करण्यात आली असे करण्यात आली असून वाहन चालकाचा परवाना सुद्धा रद्द केल्याचा जाणार आहे काय आहेत हे नियम हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
वाहतूक मंत्रालयाने दुचाकीवरील बालकांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांहून कमी वयाच्या दुचाकीवरील बालकाला क्रॅश हेल्मेट (Crash Helmet for kids) घालणं आवश्यक ठरणार आहे. हेल्मेट सक्तीसोबत रस्ते सुरक्षेबाबतचे (Road Safety Rules) अन्य काही नियम लागू करण्यात येतील. वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नवीन नियमांची 15 फेब्रुवारी 2023 पासून अंमलबजावणी (MORTH New Rules) करण्यात येईल. सर्वसाधारणपणे कोणत्याही सुरक्षेविना दुचाकीवरुन लहान बालके प्रवास करत असतात. सोशल मीडियावर एकाच दुचाकीवर 5-10 लहान मुलं स्वार असल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. बालकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी वाहतूक मंत्रालय नवीन नियम आणले आहेत.

असे आहेत नियम

चार वर्षाहून लहान वयाच्या बालकांना दुचाकीवर असताना क्रॅश हेल्मेट आवश्यक ठरणार आहे. संपूर्ण डोक्याला कव्हर करणाऱ्या हेल्मेटला क्रॅश हेल्मेट म्हणून ओळखले जाते. अन्य हेल्मेटप्रमाणं टोपीच्या आकाराचे अर्धाकृती नसते. नव्या नियमामुळे जगात लहान बालकांना दुचाकीवर हेल्मेट सक्ती लागू करणाऱ्या देशांत भारताचा समावेश होणार आहे.

सेफ्टी हार्ने आवश्यक

लहान मुलं दुचाकीस्वाराच्या मागे बसलेले असल्यास सुरक्षेच्या उपायांची कठोर अंमलबजावणी आवश्यकचं ठरते. नवीन सुरक्षा नियमानुसार, सेफ्टी हार्नेस असणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन वेगवान दुचाकीवरु मुलं गाडीवरुन पडण्याची भीती असणार नाही. सेफ्टी हार्नेस मुळे लहान मुल दुचाकीस्वाराला बांधलेलं असतं आणि 30 किलो पर्यंतचे वजन उचलू शकते. त्यामुळे तुम्ही लहान मुलाला गाडीवरुन बाहेर घेऊन निघाले असल्यास गाडीला सेफ्टी हार्नेस असल्याची निश्चितपणे खात्री करा.

वेगावर मर्यादा आवश्यक

नवीन नियमामुळे लहान मुलं गाडीवर असताना दुचाकीस्वाराला वेगानं गाडी चालवता येणार नाही. नवीन नियमानुसार, गाडीवर चार वर्षापेक्षा कमी वयाचं मुलं असल्यास वेग 40 किलोमीटर प्रति तासाहून अधिक असू शकणार नाही. मर्यादेच्या बाहेर दुचाकीची गती असल्यास हेल्मेट असूनही मुलगा गंभीर जखमी होऊ शकतो. तसेच वेगवान गाडीवर सेफ्टी हार्नेस असतानाही दुखापत होण्याचा धोका टाळता येणार नाही.