Home राज्य पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहिर

पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहिर

83

 

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार सत्कार!

बुलढाणा/प्रतिनिधी

गेल्या विस वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाला सत्य व निर्भिडपणे आपली लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 2021 -2022 चा गुरु रविदास जिवन गौरव विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष संजय खामकर व महासचिव सुर्यकांत गवळी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भिडपणे उत्कृष्ट कार्य करणारे महाराष्ट्रातील एका व्यक्ती ला दिला जातो.पुण्यात
होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दैनिक लोकमंथनचे निवासी संपादक व शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परमपुज्य धर्मगुरु निरंजनदास महाराज,सुखदेवजी महाराज, जेष्ठ साहित्यिक रतनलालजी सोनाग्रा,तरसेमलाल सेवादार यांच्यासह अनेक नामवंत दिग्गज मान्यवरांची ऊपस्थितीत १६ फेब्रुवारी रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्काचे स्वरूप शाल सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरुषोत्तम बोर्डे यांना या अगोदरही अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांनी आपल्या निर्भिड व दमदार लेखणीमुळे व सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे.