Home Breaking News किशोर होगेना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

किशोर होगेना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

85

द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

खामगाव:- पत्रकारिता करत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सांजदैनिक प्रश्नकालचे मुख्य उपसंपादक किशोर होगे यांना बसली ग्रुप नागपूरच्या वतीने काल 15 मे रोजी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
बालकलाकारांचा बसोली ग्रुपने आपल्या कला अभिव्यक्तीच्या ४८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त काल १५ मे रोजी नागपूर येथे बसोलीचा वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बसोलीग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना विशेष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल खामगाव येथील सांजदैनिक प्रश्नकालचे मुख्य उपसंपादक किशोर गजानन होगे यांना बसोली ग्रुपच्या वतीने नागपुर येथे आयोजित भव्य सोहळ्यात पत्रकार होगे यांना प्रसिध्द लेखक दिनकर बेडेकर यांच्या हस्ते हा मनाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह, मानपत्र व अकरा हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला मुबई येथील प्रसिद्ध लेखक विक्रम भागवत, वनराई फाउंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, बसोली ग्रुपचे आमंत्रक यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला नागपुरातील गणामान्य मान्यवर, बसोली प्रेमी व बसोली सदस्यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार होगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.