Home राज्य विलासराव देशमुख ग्रामीण भागातल्या विकासाचे शिल्पकार – धनंजयदादा देशमुख

विलासराव देशमुख ग्रामीण भागातल्या विकासाचे शिल्पकार – धनंजयदादा देशमुख

154

जयंती दिनानिमित्त लातूर येथे अभिवादन कार्यक्रम

लातूर :- कॉंग्रेस पक्षाचा अत्यंत महत्वाचा चेहरा म्हणजे विलासराव देशमुख होते. महाराष्ट्रात विलासरावांनी कॉँग्रेससाठी प्रचंड मोठं काम केलं काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचा उपयोग त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रासाठीसुद्धा करून घेतला. ग्रामीण भागातल्या विकासाचं श्रेय हे विलासराव देशमुख साहेबांना जाते, तेच ग्रामीण भागातील विकासाचे खरे शिल्पकार आहेत, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव रंजीत दादा देशमुख यांनी व्यक्त केली लातूर येथे आज दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन धनंजय देशमुख उपस्थित होते त्यांनी विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली व्यक्त केली या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी विलासरावांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

केवळ सचोटीने काम करणारा आणि गरजू लोकांसाठी झटणारा नेता म्हणून विलासराव देशमुख यांची आजही लोकं आठवण काढतात.जिल्हा पंचायत सशक्तीकरण व पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याचे श्रेय त्यांना जाते. महिला आणि तरुणांच्या सबलीकरणासाठी त्यांनी स्वतंत्र धोरण राबविले. महाराष्ट्रात संत घाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केले. शेतकरी व्याज अनुदान योजना राबविण्याचे श्रेय त्यांना जाते.

सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा प्रदीर्घ राजकीय प्रवासात सामान्य लोकांचे हित त्यानी जोपासले राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे मुत्सद्दी राजकारणी, कर्तृत्ववान व दिलखुलास व्यक्तिमत्त्व असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब यांचे अरे आजही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दिशादर्शक आहे असेही धनंजय देशमुख म्हणाले. आज जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी, धनंजय देशमुख, मयूर हुरसाड व कार्यकर्ते उपस्थित होते.