Home Breaking News दुःखद बातमी; जोशी नगर भागातील मनीष चिकटे यांचे निधन

दुःखद बातमी; जोशी नगर भागातील मनीष चिकटे यांचे निधन

159

 

खामगाव : स्थानिक जोशी नगर भागातील तरुण मनीष चिकटे यांचे यांचे आज  दुपारी आकस्मित निधन झाले आहे त्यांच्या निधनाने जोशी नगर घाटपुरी नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
अत्यंत मनमिळावू, मदतशिल स्वभावाचे मनिष चिकटे हे बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत नांदुरा पंचायत समितीत कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचे  आजारपणात आज दुखःद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 26/5/2022 गुरुवार रोजी सायंकाळी 06.30 ला रहाते घर जोशी नगर खामगाव येथून निघेल. जागृती क्रीडा खेळाच्या माध्यमातून ते समाजसेवेसाठी नेहमी पुढाकार घेत असत त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा (वय 5), मुलगी( वय 8) व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतात्म्यास भावपुर्ण श्रध्दांजली!