मुंबई -महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा मोठा खुलासा आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केला सोबतच घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणुकीतून मी माघार घेत असून ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांपैकी एक जागा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांना सोडली जाईल असे बोलल्या जात होते. मागील आठवड्यात संभाजीराजे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन खा. संभाजीराजे यांनी अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केली. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला.
राज्यसभेच्या उमेदवारीवरून आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारी देण्याबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
खा. संभाजी राजे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश घ्या, तुम्हाला खासदार बनवू अशी ऑफर मला होती. मी ती नाकारली, मला अपक्ष लढायचे आहे, ही भूमिका मी मांडली. त्यावर शिवसेना खासदार, मंत्री याच्या सोबत चर्चा झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षावर बैठक साठी बोलावून राजे सोबत हवेत असे म्हणत शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली. ती मी नाकारली. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव मांडला. दोन दिवसांनी पुन्हा मंत्री, खासदार यांची भेट झाली एक लेखी. Draft तयार करण्यात आला. नंतर मी अर्ज भरण्याच्या तयारी करिता कोल्हापूर आलो असता शिवसेनेची उमेदवारी संजय पवार यांना जाहीर झाली. तो माझा लाडका कार्यकर्ता आहे. मी मंत्री, खासदार यांना फोन केला असता ते काही बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्री यांनी फोन घेतक नाही असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे. सोबतच निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले.
जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटीत करणार, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
मागील 15 वर्षे मी जनतेसाठी अहोरात्र काम केले. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
