Home Breaking News वारे जिगरबाज पठ्ठया…ना. नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी तब्बल 280 किलोमीटर सायकलचा प्रवास!

वारे जिगरबाज पठ्ठया…ना. नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी तब्बल 280 किलोमीटर सायकलचा प्रवास!

164

नागपूर : तेल्हारा ते नागपूर असा तब्बल 280 किलोमीटर सायकलने प्रवास करत एक तरुण केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी य यांना भेटला. आज नागपूर येथे त्याची नामदार गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या तरुणाची नेमकी मागणी काय असेल हे जाणून घेऊया…

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील विशाल नांदोकार हा ध्येयवेडा तरुण नादुरुस्त व खराब झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने मागणी लावून धरत आहे तसेच त्याने वेळोवेळी आंदोलने सुद्धा केली आहेत. मात्र त्याची कोणीही दखल घेत नसल्याने विशालने केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि गावापासून चक्क सायकलने प्रवास करत हा पट्ट्या नागपूरला पोहोचला. २७ मे रोजी त्याने सायकलने प्रवास सुरू करत आज नागपूर गाठलं.

तेल्हारा  तालूक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था तसेच ४ वर्षांपासून रस्त्यांचे रखडलेल काम त्वरित मार्गी लागावे याकरिता येथील युवा पत्रकार विशाल नांदोकार व त्यांचे सहकारी यांनी केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांनची २९ मे ला नागपुर येथे भेट घेतली असता त्यांनी तालुक्यातील सदर रस्ते राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असले तरी मी या कामांमध्ये लक्ष घालून सदर रस्त्याचे कामे लवकरात लवकर कसे होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले .
तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या चार-पाच वर्षात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्यामुळे या तालुक्यातील रस्ते नागरिकांच्या जीवावर उठल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून बहुतांश जणांना अपंगत्व आले आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनवर विश्वास न ठेवता आता थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या तालुक्यातील रस्त्याचा प्रश्‍न सोडवावा याकरिता युवा पत्रकार विशाल नांदोकार व त्यांच्या सहकाऱ्या नी २७ मे ला तेल्हारा ते नागपूर सायकल यात्रा काढून दोन दिवसात नागपूर गाठले व २९ मे ला तेथे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना तालुक्यातील रस्त्यांबाबत निवेदन देऊन सदर रस्ते लवकरात लवकर होणे किती आवश्यक आहे याबाबत संपूर्ण माहिती दिली असता नितीनजी गडकरी यांनी सदर रस्ते हे राज्य शासनाच्या अखत्यारित येत आहेत त्यामुळे हा प्रश्न राज्य शासनाचा आहे असे सांगितले असता विशाल नांदोकार यांनी हे रस्ते राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असले तरी राज्यशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याबाबत वेळ काढू धोरण अवलंबित असल्यामुळे आपण लक्ष घालावे अशी विनंती केली असता ना . नितीन गडकरी यांनी सदर रस्त्यांच्या कामांमध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सदर रस्त्यांची कामे कसे होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी विशाल नांदोकार यांच्यासोबत प्रा उज्वल दबळघाव वैभव फोकमारे राम आखरे करण शिवणकर आदी उपस्थित होते.

गडकरींना दिले निवेदन

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून 280 किलोमीटरची सायकल वारी करून नागपूरला पोहोचलेल्या विशाल नांदोकार यास ना. नितीन गडकरी भेटले. यावेळी त्याने तेल्हारा तालुक्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. वैभवच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे

वर्तमानपत्रांनी घेतली आंदोलनाची दखल