सहदेव वाकोडे, द रिपब्लिक न्युज नेटवर्क
लाखनवाडा बु:- २९ मे-/येथील ग्रामपंचायतीच्या २५ लक्ष रुपये वीजबिल थकीत झाल्याने महावितरणकडून ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे लाखनवाडा गावांमधील सर्वात पथदिवे बंद असल्याने गावातील रस्ते अंधारात आहेत नागरिकांना आपल्या सोयीने अंधारातून मार्ग शोधावा लागत असल्याचे भीषण वास्तव लाखनवाडा गावात निर्माण झाले आहे
खामगाव तालुक्यातील लाखनवाडा सर्वात मोठे गाव असून १५ते २० खेडे या गावाची बाजारपेठ आहे गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या वर आहे गावामध्ये बँका पतसंस्था यासह विविध महत्त्वाच्या शासकीय व खाजगी सुविधा आहेत शाळा आहेत अनेक विद्यार्थी शाळा शैक्षणिक संस्थेमध्ये खाजगी शिकवणी मध्ये ये-जा करत असतात
असे असतानासुद्धा लाखनवाडा ग्रामपंचायतीच्या केवळ वीज बिला अभावी वीज पुरवठा खंडित होणे ही बाब सचिवाच्या अनागोंदी कारभाराचे मोठे उदाहरण या निमित्ताने समोर यासह ग्रामपंचायत च्या सर्वच कामांची पुरती वाट लागली आहे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज बिलाची रक्कम जवळपास २५ लक्ष रुपयांची रक्कम थकीत झाल्याची माहिती सचिवांकडून देण्यात आली वीजबिल थकीत झाल्यानेच महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे
त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना अंधारात मार्ग शोधावा लागत आहे
लवकरात लवकर हा प्रश्न निकाली न निघाल्यास नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे
