शेगाव : स्व. ऋषीदादा पाटिल (गिते) यांच्या स्मरणार्थ चिंचोली येथे लोक वर्गणीतून उभारलेल्या “मुक्तिधाम” स्मशान भूमीचा लोकार्पण सोहळा दिनांक २/६/२०२२ रोजी ह. भ. प. गुरूवर्य तुकाराम महाराज सखारामपूर यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती खामगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील, शेगांव नगरपरिषद माजी नगराध्यक्ष पांडुरंग बुच,माजी नगरसेवक श्री.गजाननभाऊ जवंजाळ, विजयभाऊ भालतडक,ज्ञानेश्वर महाराज मिरगे (गुरूजी) , प्रा. भुषण दाभाडे पाटील, हरिभाऊ काळे,श्री अरूण अरबट साहेब, गणेश शेळके,विलास शेट्ये साहेब (गो ग्रीन फाऊंडेशन),सरपंच पती गजानन बोबडे,उपसरपंच गौतम इंगळे व गावकरी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर स्मशानभूमी लोक श्रमदानातून स्थापन झालेली असून श्री.शिवशंकर पाटील गिते,श्री.सुधीर मामा अवचार,श्री.बळीराम चव्हाण,श्री रघुनाथ पाटील,श्री.दादाराव पाटील,श्री.एकनाथ तरळे,श्री.देविदास लांजुळकर,श्री.गजानन पोटे,श्री.गोपाळ ढगे यांच्या सहकार्यातून तथा स्व.ऋषिदादा पाटील सेवा प्रतिष्ठान,चिंचोली व समस्त गावकरी मंडळींच्या श्रमदानातून स्थापन करण्यात आली.
