Home विदर्भ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल उन्हाळे व टीकार यांचे प्रेस...

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल उन्हाळे व टीकार यांचे प्रेस क्लब शेगाव तर्फे सत्कार

134

शेगाव: राज्य वृत्तपत्र संघटनेवर प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल येथील प्रकाश उन्हाळे व बुलढाण्याचे राजेंद्र टिकार यांचा प्रेस क्लब शेगाव तर्फे आज दोन जून रोजी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या घटनेनुसार प्रदेश कार्यकारणीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन प्रतिनिधी पाठविण्यात येतात. बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र संघटने कडून जिल्ह्यातील दोघांची प्रदेश प्रतिनिधीपदी निवड करण्यासाठी शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक दोन जून रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी निवडणूक निरिक्षक म्हणून प्रदेश वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जळगाव खान्देश येथील गोपाल चौधरी हे उपस्थित होते यावेळी राजेंद्र टिकार आणि प्रकाश उन्हाळे या दोघांची प्रदेश वर प्रतिनिधी म्हणून निवड एकमताने करण्यात आली. उपरोक्त दोघांची निवड झाल्याबद्दल प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष अनिल उंबरकर, श्रीधर ढगे यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन उन्हाळे व टिकार या दोघांचा सत्कार केला. यावेळी राज्य वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष गोपाल चौधरी यांचाही प्रेस क्लब शेगाव च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार राजकुमार व्यास, दिपक सुरोसे, नारायण दाभाडे, संजय स्वामी, गणेश देशमुख, श्याम देशमुख, राजेश तायडे, गोविंदा धंदर, यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते