Home महाराष्ट्र न्यूज श्री गजानन महाराज संस्थान, शेगांवचा आणखी एक सेवाभावी प्रकल्प ; गोरगरीब जनतेला...

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांवचा आणखी एक सेवाभावी प्रकल्प ; गोरगरीब जनतेला मिळणार लाभ

90

श्रीधर ढगे

शेगाव- शिस्त, स्वच्छता आणि सेवाभाव याकरिता देशातील एक आदर्श देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान, शेगांवचा आणखी एक सेवाभावी प्रकल्प जनसेवेत सुरु झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने विविध 42 सेवा प्रकल्प राबविण्यात येतात. यात आरोग्य सेवेचा सुद्धा समावेश असून आता श्री संस्थानने आरोग्य सेवेत मोठी भर घालत अद्ययावत असे रुग्णालय सुरू केले आहे

रूग्णालय, दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामीण आरोग्य सेवा योजना या सर्व मंदिर परिसरातील वैद्यकीय उपक्रमांतर्गत सेवांचे दि.०९ जून, गुरूवार रोजी खामगांव रोड स्थित नव्या रूग्णालयाचे असतील. तरी गोरगरीब, गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

श्री संस्थेव्दारा संचालित वैद्यकीय सेवाकार्यांतर्गत अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक व होमियोपॅथीक इमारतीमध्ये स्थानांतरण होवून रूग्णालय रूग्णसेवेत रूजू झालेले आहे.

उपलब्ध उपचार सुविधा

क्षयरोग चिकित्सा, जनरल फिजीशियन चिकित्सा, जनरल सर्जन चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, चर्मरोग चिकित्सा, मनीविकार चिकित्सा, बालरोग चिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, नेत्ररोग चिकित्सा, स्त्रिरोग चिकित्सा, कर्करोग चिकित्सा छातीविकार चिकित्सा, दंतरोग चिकित्सा हृदयविकार चिकित्सा, न्युरोफिजीशियन चिकित्सा, मधुमेह विकार चिकित्सा, मुत्रविकार चिकित्सा, फिजीओथेरेपी चिकित्सा आयुर्वेद स्त्रिरोग चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, होमियोपॅथीक चिकित्सा, जनरल तपासनी (ओ.पी.डी.) ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र, रूग्णवाहिका सुविधा इ. सुविधा उपलब्ध आहेत.

या सर्व उपचार सुविधेसाठी श्री संस्थेच्या अधिकृत मानसेवी डॉक्टरांसह विविध चिकित्सा पद्धतीचे मा. मानसेवी तज्ञ डॉक्टर निर्धारीत दिवशी ठरलेल्या वेळेत या रूग्णालयात उपलब्ध राहणार आहेत.