Home Breaking News अबतक १४ ! खामगावातील अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अबतक १४ ! खामगावातील अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

96

खामगावात आणखी पाच व्हिडीओ व्हायरल!

खामगाव: मागील महिन्यात एकापाठोपाठ ०९ अश्लिल व्हिडीओ खामगावात व्हायरल झाले. प्रतिष्ठितांपाठोपाठ आता मध्यमवर्गीय समाज व्यवस्थेतील काही जणांची व्हिडीओ व्हायरल होत असल्याने खामगावातील अश्लिल व्हिडीओंची संख्या १४ वर पोहोचली आहे. व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील संबंधितांचे ‘अश्लिल’ या माध्यमातून चव्हाट्यावर येत आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने, संबंधितांचे मनोबल उंचावत असल्याचे दिसून आहेत.
एका वृध्द सराफा व्यावसायिकाच्या अश्लिल व्हिडीओमुळे खामगाव शहराच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेलीत. अश्लिल व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेला सहाशे किलोमीटर दूर ‘स्थायिक’ करण्यात आले. त्याचवेळी पोलीसांचीही ‘खातीर’दारी करण्यात आली. त्यामुळे ९ पैकी एका अश्लिल व्हिडीओपैकी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्यानंतर लागलीच  शिक्षिका, पोलीस कर्मचारी, एका नामांकित व्यावसायिकाच्या मुलीसोबतच, दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही आंबटशौकीनांसोबतच समाजातील प्रतिष्ठितांकडूनही या व्हिडीओंचे आदान-प्रदान सुरू आहे. तरी देखील पोलीसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केल जात आहे

इंटरनेट कॅफेमधील ‘व्यवहार’ सुरळीत!
– अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही इंटरनेट कॅफेंची पोलीसांकडून झाडाझडती घेण्यात आली. काही दिवस इंटरनेट कॅफेमध्ये सर्वच प्रकार बंद होते. मात्र, आता संबंधितांपर्यंत ‘रसद’ पोहोचती होत आहे. त्यामुळे इंटरनेट कॅफेसोबतच काही ठराविक ठिकाणचे ‘व्यवहार’ सुरळीत झाल्याचे समजते.

अनेकांचा ओढा शेगाव रोडवर
-आंबटशौकीन आणि प्रेमी युगुलांसाठी शेगाव रोडवर ‘विशेष’व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणावर दुपारी आणि रात्री ‘जोडप्यां’साठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थळावरही कारवाईसाठी पोलीस पुढाकार घेत नसल्याची चर्चा आहे.

व्हिडीओ’मुळे पडले अंतर…
– रस्त्यावरील ‘लिला’ चित्रीत होऊन समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या.  आपली बायको  दुसºयाची ‘प्रेयसी’ बनल्याचे उघडकीस येताच एका नवरोबाने आकांत तांडव केला. नातेवाईकांना बोलावून त्याने ‘नको ती डोकेदुखी’ म्हणत पत्नीला पाठवून दिले. ‘तिची’ चूक ‘तो’ कदापिही मान्य करायला तयार नाही म्हणूच त्यांच्यात आता ‘व्हिडीओ’मुळे कायमचे अंतर पडले.