Home विदर्भ चांगली बातमी; माऊली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एन्जोग्राफी, एन्जिओप्लास्टी युनीट रुग्यसेवेत

चांगली बातमी; माऊली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एन्जोग्राफी, एन्जिओप्लास्टी युनीट रुग्यसेवेत

88

 

शेगाव – ‘रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ ब्रीद खरं ठरवत माऊली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एन्जोग्राफी, एन्जिओप्लास्टी युनीट आज रुग्यसेवेत रुजू झाले आहे. या युनीटचा शुभारंभ हभप तुकाराम महाराज सखारामपूर यांच्या हस्ते पार पडले.

वै. ह. भ. प. पुरुषोत्तम हरी (गणेश) पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शेगावच्या माध्यमातून माऊली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयाच्या रुग्णांकरीता कॅथलॅब (एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी, लहान मुलांची बिनटाक्याची हृदय शस्त्रक्रिया) (महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत सुविधा) व डोळ्यांच्या रुग्णाकरीता माऊली ऑप्थेलमोजीजीचा प्रारंभ शेगांव संत नगरी आज पार पडला.

ह. भ. प. श्री तुकाराम महाराज ( ईलोरा ) यांच्या हस्ते या युनीटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळीं डॉ. प्रशांत वायचाळ (MD Medicine), डॉ. निखील किबे (Nephrologists) श्री डॉ. प्रेमचंद पंडीत (Retd. CS), डॉ. अख्तर हुसैन (MD, Medicine) डॉ. तुषार चरखा (MBBS, DNB, MNAMS) पांडुरंगदादा पाटील उपस्थित होते.

लवकरच कॅन्सरवर उपचार

प्रास्तविक करतांना ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले.त्यांनी त्यांनी संस्थेच्या सेवाकार्याची माहिती दिली तसेच लवकरच शेगाव येथे कॅन्सरवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे नाना यावेळी म्हणाले. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेगावातील बहुसंख्य नागरीक बंधू भगिनी, डॉक्टर, उपस्थित होते.