Home Breaking News आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

76

शेगाव -युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. शेगाव युवा सेना तालुका प्रमुख उमेश शेळके यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

राज्यात युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पडले. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथेही विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य व युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर शेगाव साईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे घेण्यात आले. डॉ. अनिकेत निकम, युवा सेना तालुका प्रमुख शेगाव उमेश अशोकराव शेळके, युवासेना उपतालुका प्रमुख अजय पुरुषोत्तम कोकाटे, युवा सेना शहर प्रमुख शिवा तेजराव कराळे, युवा सेना उपशहर प्रमुख अमोल धोन, विद्यार्थी सेना युवा सेना ऋषिकेश भारती , शिवा शांताराम दाणे , चेतन झांबरे , निखिल भाऊ ढोले , विजू सरदार , अन्सार शेख , विकी दाने , नितीन बर्डे, अतुल भाऊ शेळके, आदित्य दाणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.