Home विदर्भ एकनिष्ठाचे सुरजभैय्या यादव यांना राज्यस्तरीय पुरस्कार

एकनिष्ठाचे सुरजभैय्या यादव यांना राज्यस्तरीय पुरस्कार

87

 

खामगांव:- पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पनवेल येथील वासुदेव बलवंत फडके सभागृहात दि.12 जून 2022 रोजी संपन्न झाले. या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रात सामाजासाठी उल्लेखनीय कामगिरी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांचे सत्कार करण्यात आले त्यात आपल्या खामगांवचे सुपुत्र एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा रुग्णसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्यासह जितेंद्र मच्छरे यांच्या कार्याची दखल घेऊन सदर समितीच्या वतीने रायगड पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री कु. अदितीताई तटकरे , मान्यवर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुहास माने,माध्यमिक व उच्चममाध्यमिक शिक्षण मंडळाचे निवृत्त सचिव व्ही एस म्हात्रे, मराठी इंडीयन आयडॉल सागर म्हात्रे, अभिनेत्री अनघा कडू, महिला व बालकल्याण माजी सभापती सौ.उमा मुंढे, भावना घाणेकर, उद्योजक व समाजसेवक सुनील कोटीयन, सेंट बिलफेड कॉलेजचे प्राचार्य डॉ मृत्युंजय पांडे, सजमाजसेवक प्रकाशसेठ गायकवाड, पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, डॉ स्मिता पाटील आदींची उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी सुरजभैय्या यादव यांच्या कार्याचे कौतुक केले व समाज कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात सुरजभैय्या यांनी रुग्णसेवा, गौ-सेवा, या विषयावर आपले विचार मांडून सर्वांची मने जिंकली व सर्वांना सेवेसाठी प्रोत्साहीत केले. अशी माहिती अनिल चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रद्वारे दिली.