Home Breaking News कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

86

सहदेव वाकोडे,

लाखनवाडा:-  लाखनवाडा परिसरामध्ये आज सकाळी ११ वा च्या सुमारास अनोळखी इसमाचे प्रेत आढळले असल्याची घटना आज १६ जून रोजी उघडकीस आली या इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून करून सदरचे प्रेेेत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

लाखनवाडा ते फत्तेपुर दरम्यान जंगलामध्ये असलेल्या निर्जन स्थळी काही गुराख्यांना तसेच नागरिकांना सडलेला कुजलेला वास येत असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी जाऊन पाहिले असता एका इसमाचा प्रेत आढळल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली
आढळलेले प्रेत हे कुण्या व्यक्तीचे असल्याने अद्यापही स्पष्ट झाले नाही हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली व पंचनामा केला
हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठणेदार गजानन वाघ व सहायक पोलीस निरीक्षक पवार बीट जमदार भोपळे पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड आदींसह पोलिस कर्मचारी हजर होते