Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार सुरतेत ; ‘ऑपरेशन लोटससाठी ‘आमदार डॉ. संजय...

बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार सुरतेत ; ‘ऑपरेशन लोटससाठी ‘आमदार डॉ. संजय कुटेही पोहोचले!

92

 

आघाडी सरकार अस्थिर; राज्यात पुन्हा हाय होल्टेज राजकीय ड्रामा

बुलडाणा : राज्याच्या राजकारणात भूकंप घडविणाऱ्या बातम्या सकाळपासूनच येत असताना, त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही ‘पॉलिटिकल रिक्टर स्केल’ दणाणून सोडणारा आहे.
कारण शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोबत बुलडाणा जिल्ह्याचे दोन आमदार संजय गायकवाड व संजय रायमुलकर सुरतला असल्याच्याही बातम्या येत आहेत.
सध्या एकनाथ शिंदे गुजरात येथे एका हॉटेलमध्ये असून असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सुद्धा आहेत. दरम्यान बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि महकरचे आमदार संजय रायमुलकर यांचा फोनही बंद येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

ऑपरेशन लोटस ! आमदार डॉ. संजय कुटे सुरतलाला रवाना

जळगाव जामोद – शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोबत बुलडाणा जिल्ह्याचे दोन शिवसेना आमदार सुरत येथे गेलेले आहेत. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. संजय कुटे हे देखील सुरतकडे रवाना झाले असून त्यांच्यावर ऑपरेशन प्लॉटची महत्वाची जबाबदारी असल्याची माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून दुसरीकडे भाजपाने त्याचा फायदा घेण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या समवेत जवळपास 35 आमदारांचा मोठा गट गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याने शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपाचे काही नेते सुद्धा गुजरात येथे दाखल होत आहेत त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांचे खास संजय कुटे हे देखील रवाना झाले असल्याची माहिती आहे यासंदर्भात त्यांच्या लोकांशी संपर्क केला असता भाऊ सुरतला गेले असल्याचे त्यांनी सांगितले.