Home Breaking News नदी पात्रात बुडून 52 वर्षीय महिलेचा मृत्यू

नदी पात्रात बुडून 52 वर्षीय महिलेचा मृत्यू

166

गणेश भड, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

जळगाव जा.:- आज दिनांक 23 जून रोजी वडगाव येथे नदी पात्रात बुडून एका 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याविषयी दामाजी मस्के यांनी जळगावात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे सावरगाव येथील इंदुबाई काशिनाथ सोनवणे व त्यांचे पती काशिनाथ सोनवणे यांनी वडगाव शिवारात जमीन पेरणीसाठी केलेले असल्यामुळे ते आज वडगाव येथे शेतात काम करण्यासाठी गेले असताना वडगाव येथील नाव खुर्द नदी मध्ये अचानक पूर आल्याने दोन्ही पती-पत्नी वाहून मोहिदेपूर कडे वाहून गेले या पुरात त्यांचे पती काशिनाथ सोनवणे हे सुखरूप वाचले परंतु त्यांची पत्नी इंदुबाई काशिनाथ सोनवणे हिचा मृतदेह महिदपुर येथे लोकांना आढळला त्यामुळे लोकांनी सदर घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कळली व जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केलेला आहे