Home Breaking News दहावीच्या परीक्षेत गुंजकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश

दहावीच्या परीक्षेत गुंजकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश

90

 

25 टक्के विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण; सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खामगाव-कोचिंग क्लासेस क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या येथील गुंजकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीच्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या क्लास मधील तब्बल 25 टक्के विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहे.
नुकतेच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे गुंजकर कोचींग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निकालात धबधबा बघायला मिळाला. गेल्या पंचवीस वर्षांपासून गुंजकर कोचींग क्लासेस उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत आहे. यावर्षीही गुंजकर कोचींग क्लासेसमधील तब्बल 25 टक्के विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. तर 50 टक्के विद्यार्थ्यांना 80 टक्केच्या वर गुण मिळाले आहेत. गुंजकर कोचिंग क्लासेसमध्ये प्रत्येक विषयाचे तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष दिले जात असल्यामुळे असा निकाल बघायला मिळतो आहे. यामुळेच वर्षानुवर्ष गुंजकर कोचींग क्लासेसवरील विश्वास वाढत चालला असून इथे प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ बघायला मिळते. दहावीतील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच गुंजकर कोचिंग क्लासेस येथे सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मोमेंट टू देऊन गौरविण्यात आले. यावेळी गुंजकर एज्युकेशन हबचे संचालक प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांनी दहावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला क्लासेसचे सर्व प्राध्यापक विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.