@Ballarpur sivsena news
•घरकुलाच्या संदर्भात बल्लारपुर शिवसेनाचे आक्रोश आंदोलन.
•जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव उपस्थित होते
सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
बल्लारपुर:गोरगरिबांना मिळनारे प्रधानमंत्री आवास योजना, आदिवासी बांधवांना मिळणारे शबरी आवास योजना तसेच रमाई आवास येजना च्या संदर्भात बल्लारपुर शिवसेना तर्फे चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा प्रमुख व सतत पाच वेळा निवडून आलेले पूर्व नगरसेवक सिक्की यादव यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश धडक मोर्चा नगरपरिषद बल्लारपुर येथे आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा शाहू, प्रदीप गेडाम, अधि.प्रणय काकडे शहर समन्वयक, उपतालुका प्रमुख सुनिल दुधबळे, सतीश पाटणकर उपतालुका प्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे, उपजिल्हा संघटिका सुवर्णा मुरकुटे, मीनाक्षी गलघट तालुका प्रमुख, ज्योती गेहलोत शहर अध्यक्षा,लावारी उप सरपंच सुनीता राजूरकर, अधि. अर्चना महाजन,पूर्व नगरसेविका रंजीता बीरे, युवासेना तालुका प्रमुख नीरज यादव, बुटले, गौरव नाडमवार,युवति सेनाशहर अध्यक्षा अंजली सोमबंसी, गुड्डी बहुरिया, ज्योती गुप्ता, अनुदान योजना समिती सदस्य शेख युसूफ व प्रभाकर मुरकुटे जेष्ठ कार्यकर्ता व पूर्व नगरसेवक, उपशहर प्रमुख आनंद महाकाली,रामू मेदरवार सुरेंद्र संधू, बॉबी कादासी, सोनु श्रीवास, तसेच शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते सह नागरिक उपस्थित होत्या.
या वेळी बल्लारपुर मुख्याधिकारी वाघ यांना आवास योजना चे समस्या तत्काळ सोडवन्यास निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी वाघ यांनी प्रशासना तर्फे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रभाकर मुरकुटे यांनी केला.