
बल्लारपूर पेपर मिल चे स्थाई कामगार मंगेश विठ्ठल सोनटक्के यांना दुःखद निधन
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम(बल्लारपूर प्रतिनिधी)
बल्लारपूर : विसापूर इंदिरा नगर, वॉर्ड क्रमांक ५ येथील रहिवासी आणि बल्लारपूर पेपर मिलचे निष्ठावान कर्मचारी मंगेश विठ्ठल सोनटक्के (वय ५१) यांचे आज, २५ मे २०२६ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार, मंगेश सोनटक्के हे आज सकाळी नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे ७:१५ वाजता उठले होते. पाणी पिल्यानंतर त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने बल्लारपूर येथील वाघमारे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
मंगेश सोनटक्के हे स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून परिसरात परिचित होते. पेपर मिलमधील आपल्या कामाप्रती ते सदैव निष्ठावान राहिले. त्यांच्या निधनाने सोनटक्के कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सोनटक्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



