Home Breaking News आशावर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आयटक मार्फत पाठविले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे...

आशावर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आयटक मार्फत पाठविले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन! मानधन व बोनस न मिळाल्याने दिवाळी गेली त्यांची अंधारात!

115

आशावर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आयटक मार्फत पाठविले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन!

मानधन व बोनस न मिळाल्याने दिवाळी गेली त्यांची अंधारात!

चंद्रपूर:गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करा , भाऊबीजेला 10000 रू बोनस द्या, त्यांच्या कामावर आधारित मोबदल्यात दुपटीने वाढ करा , किमान वेतन द्या, प्रसुतीकालावधीत रजा मंजूर करा, जुलै पासूनचे थकीत वाढीव मानधन त्वरित द्या! अश्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी दि. 11- 10 -2022 रोजी मुंबई येथे भव्य मोर्चा काढला होता. त्या वेळेस राज्याचे आरोग्य मंत्री राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवीकांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या मागण्यांचे निर्णय जाहीर करू असे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळीचा सण येऊन सुद्धा शासनाने वचनपूर्ती केली नाही, त्यामुळे आज महाराष्ट्रभर कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्वमंत्री व आमदार यांच्या निवास्थानी निवेदनाद्वारे ओवाळणी करून भाऊबीज बोनस लागू करण्यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते .त्या अनुषंगाने आज आयटकचे राज्य सचिव कॉ .विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या वतीने संपूर्ण मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात या मागणीचे निवेदन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश कांबळे तसेच नगरपरिषदचे बांधकाम .सभापती विलास विखार यांना देण्यात येऊन वडेट्टीवार यांना मागण्यांचे निवेदन पोहचवून न्याय देण्याची मागणी केली तर चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना ब्रम्हपुरी येथील भाजप जेष्ठ नेते दीपक उराडे यांच्या मार्फत निवेदन देऊन फोनद्वारे चर्चा करून दिवाळी बोनस लागू करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना आयटकचे राज्य सचिव कॉ .विनोद झोडगे,शिवसेना उप जिल्हाप्रमुख मिलिंद भन्नारे,खोरीपा नेते जीवन बागडे,प्रशांत डांगे,संघटनेच्या तालुका अध्यक्ष ज्योत्स्ना ठोंबरे, वर्षा घुमे, अंजूषा डवरे, विश्रांती मेश्राम,गीता कोटगले,उषा नंदनवार , यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ऐन भाऊबीजेच्या दिवशी तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक निवेदन देताना या ठिकाणी उपस्थित होत्या.हे विशेष !