Home Breaking News Barmpuri @ city news ब्रम्हपूरीत पार पडली भव्य कुस्त्यांची दंगल !...

Barmpuri @ city news ब्रम्हपूरीत पार पडली भव्य कुस्त्यांची दंगल ! दंगलची परंपरा कायम ठेवल्याने युवक वर्गांत संचारला अमाप उत्साह!

111

Barmpuri @city news

ब्रम्हपूरीत पार पडली भव्य कुस्त्यांची दंगल !

दंगलची परंपरा कायम ठेवल्याने युवक वर्गांत संचारला अमाप उत्साह!

ब्रम्हपुरी (चंद्रपूर): दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्री गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग व्यायाम मंडळ पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प . सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाला
अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपक उराडे व खेमराज तिडके लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगर सेवक महेश भर्रे , अनंता उरकुडे, विनोद झोडगे, अविनाश राऊत, पत्रकार गोवर्धन दोनाडकर ,प्राचार्य डी. के .मेश्राम, बंटी श्रीवास्तव, विनोद दिवटे, संदीप राऊत, डाकराम ठाकरे, सोमेश्वर उपासे, शत्रुघ्न भर्रे, आदीं मंडळी उपस्थित होती. सन १९६५ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पेठ वार्ड येथे भेट दिली .त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापने पासून आजतागत त्यांच्या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते. हे आयोजन करीत असताना मंडळाचे प्रेरणास्थान स्व. विठ्ठलराव राऊत व स्व. प्रा.किशोर हजारे यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून दंगलीची परंपरा कायम ठेवली. पुढील काळात प्राचार्य गंगाधर पिलारे , दिगंबर कुथे, सोमेश्वर उपासे आदीं मंडळींनी मोठ्या उत्साहाने दंगलीचा सोहळा आयोजीत करीत आले. त्यानंतर त्या काळात जय बजरंग व्यायाम मंडळाची धुरा युवक नेतृत्वाकडे आली .त्यात प्रकाश कुथे, ओमसागर उरकुडे , लोकेश भरदे, सुभाष उपासे इत्यादीं युवक मंडळींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अथक परिश्रम घेतले. आता त्यांच्याही पुढे जाऊन पेठवार्ड येथील तिसरी पिढी यात कुणाल भगत, प्रदीप उरकुडे, परिमल उरकुडे, विशाल राऊत, विकास ठाकरे इत्यादी मंडळी दीपावलीच्या दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करीत आहे पेठवार्ड येथील ५७ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण मल्लांचा मान -सन्मान करून यशस्वीरित्या पार पाडीत असतात असे मत प्रास्ताविकात संदीप राऊत यांनी व्यक्त केले.
भव्य कुस्त्यांच्या दंगलीत तीन-चार जिल्ह्यातील कुस्तीगार उपस्थित होते. सदरहु सामना मोठ्या उत्साहात पार पडला.

“ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू मात्र तालीमा करिता क्रीडांगणाची सोय नाही.”
ब्रम्हपूरी तालुका हा क्रीडाक्षेत्रात नावाजलेला असून कुस्तीचे अनेक उत्कृष्ट खेळाडू असून यात मुल आणि मुली देखिल आहेत त्यांनी कुस्तीमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत.इतकेच नाही तर ब्रम्हपुरीच नाव रोशन केले आहे. जिथे जागा उपलब्ध होईल तिथे ही मुल सराव करतात. मात्र त्यांना खेळण्यासाठी अद्यापपर्यंत एकही हक्काचे क्रीडांगण उपलब्ध झाले नाही.
या खेळाडूंनी शासन-प्रशासनाला अनेक निवेदन देऊन सुद्धा त्यांची मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही किंवा यांच्या मागणी कडे कोणत्याही लोकप्रतिनीधींनी लक्ष वेधले नाही.