Home Breaking News Chimur @taluka news प्रेमाचे सुत जुळले अन् ते प्रेमी युगुल विवाहबध्द...

Chimur @taluka news प्रेमाचे सुत जुळले अन् ते प्रेमी युगुल विवाहबध्द झाले!

264

Chimur @taluka news

प्रेमाचे सुत जुळले अन् ते प्रेमी युगुल विवाहबध्द झाले!

मांगलगाव( चिमूर ):प्रेमाच्या अतुट बंधनात गुरफटंलेले प्रेमी युगुल काल गुरुवारी जातीचे बंधने झुगारून विवाह बध्द झाले आहे.

ग्राम पंचायत मांगलगाव व तंटामुक्त समितीच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळात काल एका आंतरजातीय प्रेमी युगुलांचा सरपंच प्रफुल कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह पार पडला.
विवाह बध्द झालेल्या युवतीचे नाव कु. शरयू प्रमोद मालके असे असून ती डोमा येथील मुळ रहिवाशी आहे. सचिन आत्माराम ढोणे या तरुणाचे शरयुवर गेल्या काही दिवसांपासून अतूट प्रेम जडले होते. विवाह करण्याचा त्या दोघांनी आपल्या मनाशी निश्चय केला होता .
काल त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.
दरम्यान सरपंच प्रफुल कोलते यांनी दोघांना ही भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे.