Home Breaking News Rajura @city news राजुरा शहरात एक देशी कट्टा,चार जिवंत काडतूस युवका...

Rajura @city news राजुरा शहरात एक देशी कट्टा,चार जिवंत काडतूस युवका कडून जप्त

343

Rajura @city news
• राजुरा शहरात एक देशी कट्टा,चार जिवंत काडतूस युवका कडून जप्त

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

राजुरा:राजुरा शहरातील राजुरा असिफाबाद मार्गावरील न्यू एरा ऑफ कॉन्व्हेन्ट राजुरा मागे लोऊजीत सिंग देवल वय २१ एका व्यक्तीला एक देशी कट्टा आणि चार जिवंत काडतूस ची विक्री करीत असताना राजुरा पोलिसांनी रंगे हाथ पकडले.

विकत घेणारा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला सदर कारवाही उप विभागीय पोलिस अधिकारी राजा पवार राजुरा चे ठाणेदार संतोष दरेकर पोलिस कर्मचारी खुशाल तेकाम,किशोर तुमराम रवि नक्कनवार,संदीप बुरटकर,तिरुपती जाधव रामा मिगेवार यांनी कार्यवाही केली.

आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा ३/२५ नुसार कार्यवाही केली आरोपीला अटक करण्यात आली या कार्य वाही मुळे मोठी घात पात घटनेला आळा बसला आहे.

राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात हत्यार असल्याची माहिती असुंन कोळसा तस्करा मधील वादा मुळे मोठी घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांच्या कारवाही मुळे शहरातील मोठा घातपात पुढे येण्याच्या शक्यता आहे राजुरा चे ठाणेदार संतोष दरेकर यांनी सांगितले की गुप्त माहिती नुसार कार्यवाही केली आहे पुढील तपासात निष्पन्न होईल आरोपी ची कसून तपासणी करून पुन्हा किती कट्टे आहे याचा तपास करण्यात येईल असे सांगितले.