Home Breaking News खबरदार ! यापूढे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही...

खबरदार ! यापूढे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ कायदेशीर सल्लागार ऍड.राजेंश सिंग यांचे प्रतिपादन

213

खबरदार ! यापूढे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ कायदेशीर सल्लागार ऍड.राजेंश सिंग यांचे प्रतिपादन

 

मारेगाव,१९ ऑक्टोंबर २०२२ :
पत्रकार संघाच्या कार्यप्रणालीवर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पत्रकार संघात सहभागी
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतांना त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा नेहमीच प्रयत्न हाेत असताे.तरीही मात्र पत्रकार आपल्या लेखनीच्या माध्यमातुन निर्भीडपणे शासन, प्रशासन व अन्याय अत्याचाराच्या विराेधात ताे वाचा फाेडण्याचे काम करत असतो तसेच शहरात होत असलेले भ्रष्ट्राचार उघडकीस आनत असताे. याचाच राग मनात धरून मारेगांव येथील काही समाजकंटकांकडुन स्थानिक पत्रकारांवर ताशेरे ओढण्याचे काम सध्या हाेत आहे. त्यात पाेलिस प्रशासनही बघ्याची भुमिका घेत असून कुठलेही ठाेस पुरावे नसतांना तसेच रितसर चाैकशी न करता पत्रकारांचा आवाज दाबण्याचा केविलवाना प्रयत्न हाेत आहे. मात्र यापुढे मारेगांव शहरांसह इतरही शहरातील राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाच्या पत्रकारांवर अन्याय होत असेल तर आंम्ही कदापी खपवून घेणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे विदर्भ कायदेशिर सल्लागार ऍड. राजेंद्र सिंग यांनी केले. ते मारेगाव येथील किन्हेकर सभागृहात आयोजित मारेगाव तालुका पत्रकार संघाचे राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघात विलीनीकरण सोहळ्यात व्यासपिठावर बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव येथील जेष्ठ पत्रकार भास्कर धानफुले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात सामील झालेल्या संपूर्ण पत्रकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले. तसेच विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे यांची देखील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच विदर्भ संघटक निलेश ठाकरे यांनी पुराेगामी पत्रकार संघ मारेगांव येथिल पत्रकारांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही देवून आपले मनाेगत व्यक्त केले. पूढे म्हणाले की सर्वांनी पुरोगामी पत्रकार संघात सहभागी होऊन निर्भीडपणे आपली पत्रकारिता करावी, आपली पत्रकारीता निष्पक्ष असावी, आपली लेखनी ही धारदार व दर्जेदार असावी असाही त्यांनी उपस्थित पत्रकारांना कानमंत्र दिला.

मारेगाव येथील आयोजित कार्यक्रमा दरम्यान मारेगाव तालुका अध्यक्ष पदी सुमित हेपट यांची नियुक्ती केली तर तालुका सचिव पदी माणिक कांबळे, उपाध्यक्ष पदी भास्कर राऊत, सहसचिव पदी भैय्याजी कनाके,
कोषाध्यक्ष सुरेश पाचभाई, संघटक धनराज खंडरे, प्रसिद्धी प्रमुख आनंद नक्षणे, सदस्य म्हणून सुरेश नाखले, गजानन आसूटकर, गजानन देवाळकर, सुमित गेडाम यांना सदस्य पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. मारेगाव येथील जेष्ठ पत्रकार माेरेश्वर ठाकरे यांच्या कामाची दखल घेत यवतमाळ जिल्हा प्रभारी म्हणून ठाकरे यांना बढती देत प्रशस्ती पत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यवतमाळ जिल्हा प्रसिद्दी प्रमुख म्हणून जेष्ठ पत्रकार मा.भास्कर धानफुले यांचेकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात सामील झालेल्या पत्रकारांच्या चेहऱ्यावर भयमुक्त झाल्याचे दिसून येत होते.