Home Breaking News Chandrapur @city news आज चंद्रपूरात होतोय राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाचा...

Chandrapur @city news आज चंद्रपूरात होतोय राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाचा महामेळावा ! मूलचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार यांचेसह होणार अनेकांचा महामेळाव्यात सत्कार समाज बांधवांनी मेळाव्यात उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे अजय मॅकलवारांचे आवाहन

208

Chandrapur@ city news

• चंद्रपूरात होतोय राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाचा महामेळावा !

• मूलचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार यांचेसह होणार अनेकांचा महामेळाव्यात सत्कार

• समाज बांधवांनी मेळाव्यात उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे अजय मॅकलवारांचे आवाहन

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर:गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार- यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने येत्या 30ऑंक्टोंबर 2022 ला सकाळी 11 वाजता स्थानिक राजीव गांधी सभागृह ,(जंयत टाॕकीज जवळ ,चंद्रपुर )येथे भव्य राज्यस्तरीय उपवर-उपवधु परिचय मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

याच भव्य मेळाव्यात विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हा शाखा चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष , मंडळ अधिकारी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी , मूलचे एक प्रगतीशील शेतकरी तथा चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार यांचे सह अनेकांचा सत्कार होत आहे.

पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षि वि.म.उजवणे यांचे सहवासात कोमलवार यांनी अनेक वर्षे घालवून संघटनेच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कामे केली आहे.समाज कार्यात ही त्यांचा मोलाचा व सिंहाचा वाटा राहिला आहे हे विशेष!आज चंद्रपूर मुक्कामी होवू घातलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लाभणार आहे .तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ समाजसेवक गणपतराव बुर्रीवार हे विभूषित करणार आहे.

आयोजित भव्य मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट निर्माते तथा साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद तेलंगाणाचे रविकिरण यादव ,नामदेवराव आयलवाड, क्रिष्णाजी यादव नागपुर ,प्रकाशराव मॅकलवार यवतमाळ ,श्रीरामजी गालेवाड मनोहरजी बोदलवार पुरुषोत्तम कोमलवार,श्रीनिवास जल्लेवार डाॕ.भास्कर बहिरवार,दिगांबर जंगीलवाड,दिगांबर करेवाड, सुनिल उट्टलवार, प्राचार्य साईनाथ आदर्लावार, भास्कर नन्नावार,संतोष मंथनवार ,आंनदजी विरय्या यशवंत दंडीकवार ,आशिष कावटवार ,मलन्नाजी बुरमवार सोमेश्वरजी पाकेवार आदीं मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहेत.
सदरहु राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार- यादव समाजबांधवांनी मोठ्या संंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार , उपाध्यक्ष दिलीप मॅकलवार ,किरण चेनमेनवार ,सचिव महेश मॅकलवार ,कोषाध्यक्ष कृष्णाजी दाऊवार ,सहसचिव शंकर मद्देलवार ,श्यामराज भंडारी ,संघटक प्रविण भिमणवार तसेच संपुर्ण कार्यकारणी सदस्यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.