Home क्राईम Chandrapur @city news तुकुम शाहिद भगत सिंग चौक,एसटी वर्कशॉप येथे सुभाष कासनगोटूवार...

Chandrapur @city news तुकुम शाहिद भगत सिंग चौक,एसटी वर्कशॉप येथे सुभाष कासनगोटूवार यांच्या नेतृत्वात स्वछता अभियान राबविली

118

 Chandrapur@ city news

• तुकुम शाहिद भगत सिंग चौक,एसटी वर्कशॉप येथे सुभाष कासनगोटूवार यांच्या नेतृत्वात स्वछता अभियान राबविली

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर: समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. स्वचछते मध्ये मानांकन उंचविण्याचे ध्येय जेव्हा आपण नजरे समोर ठेवतो तेव्हा त्यामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे,असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुभाष कासानगोट्टूवार यांनी केले.

तुकुम् शहीद भगत सिंह चौक एसटी वर्कशॉप येथे स्वच्छता अभियान राबवत असताना ते बोलत होते.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर स्वच्छता व सौदर्यकरण लीग स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माझ्या शहरासाठी माझे योगदान या थीमवर वॉर्ड स्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे.

त्याअंतर्गत २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी एसटी वर्कशॉप चौक, तुकूम येथे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ संघ च्या वतीने संघ प्रमुख सुभाष कासानगोटूवार यांचा नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी सौ.मंजुश्री कासानगोट्टूवार,प्रज्ञा गंधेवार, विजय चीताडे,बबनराव अनमुलवार,चंदा इटनकर,देवराव बोबडे, पुरुषोत्तम सहारे,संजय कोत्तावर,अशोक संगिडवार,नरेश वानखेडे,रमेश तूराणकर,दादाजी ठेंगणे,धर्माजी खंगार,गणेश पिंपळकर,किशोर धारणे, बबनराव धर्मपुरिवार,गजानन भोयर,राजेंद्र गिरडकर,मधुकर अडपेवार,प्रमोद पगाडे,देवराव ठावरी,सीमा मडावी,आनंदराव मांदाडे ,अरविंद मडावी, पुंडलिक रोडे,देवराव बोबडे, वसंत राव धंदरे पाटील,संतोष राऊत,वासुदेव नवले, दीपा नागरीकर, नीलिमा गोगीरवार, आण्याजी धवस, मालती लांडे,गोकुळदास बालकृषण बोंडे, नंदू धोटे,प्रशांत वरारकर,तुलसीदास चालेकर,नारायण पतरंगे,अमोल संगापल्लिवर, भास्कर इसनकर,भास्कर भोकरे, भोलाराम सोनुले,गीता तुराणकर,सुरेश कन्नोजवार,राजू वाहाडे आदींची उपस्थिती होती.
माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार व सर्व सदस्यांनी मिळून एसटी वर्कशॉप परिसरात स्वच्छता केली, व स्वच्छताचे यावेळी नारे देण्यात आले, सोबतच सुभाष कासंगोटूवार यांनी भाजी विक्रेत्यांना व नागरिकांना स्वच्छताचे महत्त्व व या अभियाना बद्दल माहिती दिली

ज्यामध्ये वेस्ट ऑफ बेस्ट (टाकाऊ पासून टिकाऊ), टाकाऊ वस्तू पासून चौकाचे सौंदर्यकरण ,वृक्षांची देखभाल, पेंटिंग्जच माध्यमातून घोषवाक्य लिहून जनतेला स्वच्छतेचे संदेश देणे,ओला सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्तींग करणे,वॉर्ड मध्ये प्लास्टिक बंदी करणे,वॉर्ड मध्ये प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशवी वापरने ,झाडे लावणे,या सर्व कार्याची माहिती देण्यात आली,आणि ही सर्व जवाबदारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघचे पदाधिकारी यांनी घेतली असून या अभियानात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे