Home Breaking News Mul @city news मूलला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची ७७ वी जयंती...

Mul @city news मूलला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची ७७ वी जयंती साजरी !

111

Mul @city news

मूलला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची ७७ वी जयंती साजरी !

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

मूल : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा मूलच्या वतीने दि. १ नोव्हेंबरला शहरातील वॉर्ड न. १४/१५ येथील शांतीवन बुद्ध विहारात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली.या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक वाकडे यांनी विभूषित केले होते.

आयोजित कार्यक्रमात गोकुलदास बांबोळे मुरलीधर घोनमोडे, सहदेव रामटेके यांनी मार्गदर्शन केले. सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गेडाम , काजल दुधे ,मनोहर दुर्गे, सपनाताई निमगडे, व वालदे प्रामुख्याने उपस्थित होते.या शिवाय वॉर्डातील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

प्रास्ताविक भाषण दिलीप गेडाम यांनी केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सपनाताई निमगडे यांनी केले.तर उपस्थितीतांचे
आभार काजल दुधे यांनी मानले .