Home कृषी Chimur @ taluka news नेरीत कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अनेक अधिवक्त्यांनी...

Chimur @ taluka news नेरीत कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अनेक अधिवक्त्यांनी केले मार्गदर्शन

129

Chimur @ taluka news

नेरीत कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम
अनेक अधिवक्त्यांनी केले मार्गदर्शन

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

नेरी (चिमूर ):शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ ला तालुका विधि सेवा समिती चिमूरच्या वतीने कायदे विषयक जनजागृतीचा कार्यक्रम ग्रामपंचायत नेरी येथे आयोजित करण्यात आला होता.

या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. या शिवाय सदरहु कार्यक्रमात कायदे विषयक बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली.

नागरिकांमधील कायदे विषयी संभ्रम आणि असमंजस्य स्थिती दूर करण्याविषयी माहिती या चर्चासत्रा दरम्यान देण्यात आली.

नागरिकांना महिला कायदेविषयी, घरगुती हिंसाचार बाबत तसेच खोटे गुन्हे कसे दाखल करण्यात येतात अश्या विषयां बाबत माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नेरी ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा पिसे यांनी विभूषित केले होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सांख्यिकी विस्तार अधिकारी नन्नावरे व ग्रामपंचायतचे सचिव धावणे उपस्थित होते.

उपरोक्त आयोजित कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शन अधिवक्ता सोंडवले, ऍडव्होकेट मून, ऍडव्होकेट मेश्राम यांनी केले.
सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता‌ नेरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सदस्य वर्गांनी मोलाचे सहकार्य केले.