Home चंद्रपूर Chandrapur@city news बहिणींच्या स्नेहातुन समाजकार्याची ऊर्जा मिळते: आ. किशोर जोरगेवार ...

Chandrapur@city news बहिणींच्या स्नेहातुन समाजकार्याची ऊर्जा मिळते: आ. किशोर जोरगेवार भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन-यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार

128

Chandrapur@city news

• बहिणींच्या स्नेहातुन समाजकार्याची ऊर्जा मिळते: आ. किशोर जोरगेवार

• भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन-यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारीत आहे. जो मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या अतुट प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा हा महत्त्वाचा सण आहे.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी भाऊबीज हा कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमाला आल्यावर माझ्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती पाहुन वाढलेल्या जबाबदारीची मला ‌जाण होते. यंग चांदा ब्रिगेडच्या या बहिणींच्या स्नेहातुनच सामाजिक क्षेत्रात नव्या जोमाने काम करण्याची मला सदैव उर्जा मिळत असल्याचे भावनिक मनोगत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्थानिक यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने येथील जगन्नाथ बाबा मठात भाऊबीज कार्यक्रमाचे काल रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला कल्यानी जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, बाळा साहेब यांचे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख नितिन मत्ते, जिल्हा संपर्क प्रमुख बंडू हजारे, नरेश काळे, संदीप दिवाण आदींची मंचावर उपस्थिती होती.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देता यावा यासाठी आपण यंग चांदा ब्रिगेडची स्थापना केली होती. केवळ समाजकारण हेच या संघटना स्थापनेमागचा मुळ उद्देश होता. सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना महिलांचा लक्षणीय सहभाग लाभला गेला. आज ही संघटना विस्तारित झाली आहे. यातही यंग चांदा ब्रिगेडच्या सक्रिय महिला सदस्यांचे फार मोठे योगदान आहे. या भगीनींमुळेच संघटना समाजातील दुर्लक्षीत घटकांपर्यंत पोहचुन त्यांना न्याय देऊ शकलो असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यंग चांदा ब्रिगेड आता मोठा परिवार झाला असुन परिवार प्रमुख म्हणून माझ्या जबाबदा-याही तेवढ्याच वाढल्या आहे. या संघटनेत कार्यरत महिला भगिनी घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. कामाच्या व्यस्ततेत त्यांचे त्यांच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष होत असते. त्यामुळे आपण महिलांसासाठी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करणार आहोत. या शिबिरामध्ये तपासणी, औषधोपचार आणि कोणता रोग आढळल्यास त्यावरती मोफत उपचार केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वी आपण आयोजित केलेल्या माता महाकाली महोत्सवात या कार्यरत महिलांचा सहभाग लाभला होता.

त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम रित्या पार पाडल्या. संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात महिलांचे मोठे योगदान राहिले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधन आणि भाऊबीज हे कार्यक्रम दरवर्षी घेतल्या जात आहे. भाऊ बहिण्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या आयोजनात कधीही खंड पडू देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यंग चांदा ब्रिगेड ही सुख दु:खात सहभागी होणारी संघटना असुन तुमच्या कठीण काळी मला आठवण करा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिल असेही ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी आमदार जोरगेवार यांचे औक्षवण करीत भाऊबीज थाटात साजरी केली. या वेळी आमदार जोरगेवार यांनीही उपहार स्वरूपात सर्व उपस्थित बहिणींना भेटवस्तू दिल्या.
आयोजित कार्यक्रमात कथ्थक या नृत्य प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर पूरस्कार प्राप्त करणाऱ्या सपना पॉल आणि पड्याल या चित्रपटात अभिनय करणाऱ्या निखील कडुकर यांचा आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनिषा पडगेलवार यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला. तर रिध्दी राऊत यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर संघटीका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, अस्मिता डोणारकर, अल्का मेश्राम, प्रेमीला बावणे, कविता निखारे, विमल कातकर, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, स्मिता वैद्य, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, रुपा परसराम, शमा काजी, वंदना हजारे, नंदा पंधरे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली होती.