Home क्राईम Korpna@ taluka news सावधान! वाघ येतोय बांधावर ! शेतातील काम करणे...

Korpna@ taluka news सावधान! वाघ येतोय बांधावर ! शेतातील काम करणे झाले अवघड !

166

Korpna@ taluka news

सावधान! वाघ येतोय बांधावर !
शेतातील काम करणे झाले अवघड !

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधि)

कोरपना:आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील काम करणारा कर्मचारी अगदी सुरक्षित आहेत. परंतु या भागातील शेतकरीवर्ग मात्र भितीयुक्त वातावरणात आपले जीवन कंठीत आहेत.दरम्यान या भागात दिवस रात्र फिरणा-या वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग पूर्णता अपयशी ठरला आहे .असा स्पष्ट आरोप
महिला आघाडीच्या अध्यक्षा शिला धोटे यांनी केला आहे.
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बहुतांश गावातील सध्या कापूस वेचणी व गहू, हरबरा पेरणीचे कामे शेत शिवारात धडाक्यात सुरू आहे . त्यामुळे ग्रामीण परिसरातील महिलावर्ग आपल्या शेतात जात आहेत, पण आता शेतकऱ्यांच्या बांधावर वाघ येत असल्याची चर्चा आहे.सध्या हा वाघ विरूर पैनगंगा वेकोली परिसरात आल्याचे परत एकदा ऐकिवात आहे .हा वाघ आवारपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत आल्याचे बोलल्या जात असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे करतांना सावध राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील वनविभाग आणि ग्रामपंचायतीने गावपातळीवर निदान एखादी दवंडी देण्याची आवश्यकता आहे .

आता तर या वाघाच्या दहशतीमुळे शेतात जायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून बकऱ्या गाय, म्हशी आणि बैल पाळत असतात . त्यांना चराईसाठी शेत शिवारात‌ नित्य न्यावे लागत आहे . कास्तकारांना आपला जीव मुठीत घेऊन हे काम करावे लागत आहे. आजच्या घडीला कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव आणि आवारपूरच्या परिसरात या वाघाची भीती निमार्ण झाली .त्यामुळे घरचा व्यक्ती कधी घरी परत येतो , यांची कुटुंब प्रतिक्षा करीत असते.

वनविभागाने आता या बाबी कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे . पण तसे होतांना मात्र दिसत नाही . या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतात जातांना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली हे मात्र तेव्हढेच खरे आहे.