भिसी नगरीत परत एकदा बिबट्याची भीती!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात आज ही वाघाची दहशत असून शेतकऱ्यांना शेतीतील कामे करणे कठीण झाले आहे.याच भागातील ब-याच लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.त्याच व्यवसायावर त्यांचे कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह चालत असतो .अश्यातच दोन दिवसांपूर्वी रविवारच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान आश्रम शाळा रोड भिसी येथे सिराज सय्यद यांच्या घराच्या बाजूला बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली असल्याचे समजते.
रात्रीच्या वेळी सिराज यांच्या छोट्या मुलाला कुत्र्याचा आवाज आला .तो कुत्रा जोरजोराने ओरडत होता .बाहेर का सुरु आहे हे बघण्यासाठी तो मुलगा घराच्या बाहेर पडला तेव्हा त्याला बिबट्याने कुत्रा पकडल्याचे प्रत्यक्षात दिसले . घटना बघताच तो मुलगा भीतीपोटी घरात शिरला व झोपी गेला .
भिसी गावा लगतची ही नविन वस्ती असून या ठिकाणी आता बिबट्याचा शिरकाव होत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरहु घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला वन विभागाचे राऊंड ऑफिसर संतोष अतकर यांनी भेट देत पाहणी व चौकशी केल्याचे वृत्त आहे .
