Home Breaking News Chandrapur @ city news श्री संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त...

Chandrapur @ city news श्री संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त चंद्रपूरात भव्य शोभायात्रा ;आ. किशोर जोरगेवारांनी केले शोभायात्रेचे स्वागत

177

Chandrapur @ city news

श्री संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त चंद्रपूरात भव्य शोभायात्रा ;आ. किशोर जोरगेवारांनी केले शोभायात्रेचे स्वागत

सुवर्ण भारत: किरण घाटे (पोर्टल न्यूज़)

चंद्रपुर:सुदर्शन समाजाचे आराध्य दैवत श्री संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जटपूरा गेट येथे स्वागत केले. या वेळी शोभायात्रेत सहभागी सुदर्शन समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शित पेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या वतीने श्री संत महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणाहुन निघालेली रॅली छोटा बाजार येथे एकत्रित झाली. त्यांनतर भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. सदरहु शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी जटपुरा गेट येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती.

शोभायात्रा येथे येताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी आज शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी श्री संत महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत नमन केले. शोभायात्रेत सहभागी सुदर्शन समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेड तर्फे शितपेयाचे वाटप करण्यात आले.

शोभायात्रेच्या स्वागतासाठी यंग चांदा ब्रिगेडचे प्रतिक शिवणकर, राशेद हुसेन, जितेश कुळमेथे, विलास वनकर, विश्वजीत शाहा, तापुष डे, नितेश गवळे, करणसिंह बैस, गौरव जोरगेवार, रोषण राठोड आदींची उपस्थिती होती.