Home Breaking News Varora @taluka news उखर्डां येथे ग्राम स्वच्छता

Varora @taluka news उखर्डां येथे ग्राम स्वच्छता

200

Varora@ taluka news

• उखर्डां येथे ग्राम स्वच्छता

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

वरोरा: तालुक्यांतील उखर्डां येथे ग्राम स्वच्छता राबविण्यात आली. गावातील युवकांनी एकत्र येऊन ग्राम स्वच्छता केली . वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उखर्डा हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपास आले. आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झाला.

हा गाव आदर्श कसा आहे हे कित्येक वेळी येथील युवकांनी दाखवून दिले आहे. कोरोना मध्ये लॉक डाऊन ज्ञान शाळा असो, ग्राम स्वच्छता असो, गोर गरीब, मजुरांना अन्य धान्य किट वाटप असो, रक्तदान शिबिर असो वेळोवेळी येथील युवक सामजिक कार्यासाठी कटीबद्ध असतो.

हनुमान मंदीर परिसर येथे आज गावांतील युवकांनी ग्राम स्वच्छता केली, मंदिराची रंग रंगोटी केली. त्या नंतर परिसर फुलून दिसत आहे. यावेळी योगेश पुसदेकर, गजानन देवतळे, ऋषिकेश कुडे, क्रिश कुडे, बबलू धोटे, प्रशांत हीवरकर, पंकज डोमकावडे , अभिजीत कुडे हे युवक सक्रिय होते.