Home चंद्रपूर Ghuggus@ city news भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त ...

Ghuggus@ city news भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

164

Ghuggus@ city news

■ भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त

■ जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
घुग्घुस शहर प्रतिनिधि

घुग्घुस:रक्तदान हेचं जीवनदान हे ब्रीद मानून सलग १८ व्या वर्षी घुग्घुस येथील गांधी चौकात सोमवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त देवरावदादा भोंगळे मित्र परिवारा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, इंदिरा नगर, वरोरा, भद्रावती, बीबी, कोरपना, राजुरा, बल्लारपूर, चंदनखेडा, जिवती, गोंडपिपरी, तोहगाव, चिंतलढाबा याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी १७५३ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून विक्रम केला होता. मागील १७ वर्षांपासून घुग्घुसमध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे.

घुग्गुस येथील शिबिरातून ४०० बॅग रक्तपुरवठा दंगलग्रस्त अमरावती शहराला पाठवण्यात आल्या होत्या. या वर्षी नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली व अहेरी येथील शासकीय रक्तपेढीला रक्तपुरवठा करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिराला मोठया संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे व रक्तदान करून देशसेवा करावी असे आवाहन आयोजक देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.