Home Breaking News Chimur @taluka news गायरान जमीनीवरील अतिक्रमीत घरे हटविणार नाही आ....

Chimur @taluka news गायरान जमीनीवरील अतिक्रमीत घरे हटविणार नाही आ. बंटी भांगडियांनी दिल्या तहसीलदारांना सुचना ! भाजप पदाधिका-यांनी घेतली तहसीलदार प्राजक्ता बुरांडेंची भेट !

86

Chimur @taluka news

■ गायरान जमीनीवरील अतिक्रमीत घरे हटविणार नाही

■आ. बंटी भांगडियांनी दिल्या तहसीलदारांना सुचना !

■भाजप पदाधिका-यांनी घेतली तहसीलदार प्राजक्ता बुरांडेंची भेट !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर: गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार असल्याच्या नोटीसा प्रशासनाने तालुक्यातील अतिक्रमण धारकांना दिल्या असल्याने त्यांचेत नाराजी चा सूर उमटू लागला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी तात्काळ तहसीलदार यांना भ्रमणध्वनी वरून सूचना देत सांगितले की राज्य सरकारने याबाबत विचार करून कुठलेही अतिक्रमीत घर पाडले जाणार नाही .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडून अतिक्रमण स्थगिती होणार असल्याचे सांगत अतिक्रमण धारकांनी आलेल्या नोटीसला घाबरू नये आणि कोणाचेही घरे पाडले जाणार नाही असा विश्वास देत तहसीलदार यांना तश्या सूचना केल्या असल्याचे समजते.

दरम्यान या तालुक्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमण धारकांना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत . अतिक्रमण धारकांना धीर देत त्यांची घरे पाडली जाणार नाही .यासाठी आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे ,भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे व अन्य पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयात जावून येथील तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना अतिक्रमण धारकांची घरे पाडू नये असे सांगत स्थानिक आमदार बंटीभाऊ भांगडिया सतत शासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,सरपंच संघटनाचे तालुकाध्यक्ष सरपंच अरविंद राऊत, रमेश कंचर्लावार, पराग अंबादे व तालुक्यातील अतिक्रमण धारक उपस्थित होते.