Home Breaking News डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीद्वारे आवारपूरात सुरेश दिवे यांचा सत्कार!

डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीद्वारे आवारपूरात सुरेश दिवे यांचा सत्कार!

174

डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीद्वारे आवारपूरात सुरेश दिवे यांचा सत्कार!

सुवर्ण भारत;किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधत ग्रामपंचायत सदस्य सुरेश दिवे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई रमाबाई मंडळाच्या वतीने शाल श्नीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तदवतचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन ! संविधान म्हणजे धर्म, प्रांत,भाषा, आचार,विचार अश्या असंख्य तुकड्यांना देश नावाच्या सुंदर गोंधळीत विणणारा अमूल्य धागा म्हणजे आपले भारतीय संविधान! संविधान दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहीत संपूर्ण देशवासियांना सन्मानाने जगण्याचा मूलमंत्र दिला.

स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या तसेच भिमराव आंबेडकर बहुउदेशीय संस्थाचे अध्यक्ष गौतम धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन या वेळी मिठाई वाटप करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष गौतम धोटे , सचिव दर्शन बदरे , रमेश खाडे , प्रमोद चांदेकर , मुर्लीधर वानखेडे ,संदिप खाडे , मयूर जिवने , सज्जन बदरे , संतोष नारनवरे , विनोद धोटे , विरांजन बदरे , विशाल वानखेडे , तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दिवे , सदस्य सुरेश दिवे , दत्ता दिवे, वैभव दिवे , आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या पुष्पाबाई बदरे , चेतना खाडे , शिला धोटे , लताबाई वानखेडे , शालूबाई धोटे , शुध्दलेखा खाडे , सविता बदरे , धम्माबाई जिवने , सविता नारनवरे , शितल ठमके , गिरजाबाई चांदेकर , स्मिता बदरे , या शिवाय पदाधिकारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव दर्शन बदरे यांनी केले तर आभार उपस्थितीतांचे आभार विनोद धोटे यांनी मानले .