Home Breaking News Chimur taluka @news सुश आसरा फौंडेशन व अत्पलवर्णा कुंग फु कराटे...

Chimur taluka @news सुश आसरा फौंडेशन व अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी यांचे संयुक्त विद्यमाने-नॅशनल लेव्हल कुंग फु कराटे चॅम्पियनशीप २०२२ संपन्न ! घुग्घूसची टीम राष्ट्रीय स्तरावर विजेता ठरली ! २९ टीमनी नोंदविला आपला सहभाग

107

Chimur taluka @news

■ सुश आसरा फौंडेशन व अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी यांचे संयुक्त विद्यमाने-नॅशनल लेव्हल कुंग फु कराटे चॅम्पियनशीप २०२२ संपन्न !

■ घुग्घूसची टीम राष्ट्रीय स्तरावर विजेता ठरली !

■ २९ टीमनी नोंदविला आपला सहभाग

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर: सुश आसरा फौंडेशन व अतपलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरीच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच चिमूर येथे कराटे स्पर्धा संपन्न झाली. यात घुग्घूस टीम प्रथम विजेता ठरत राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली आहे.

स्थानिक शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात कुंग फु कराटे स्पर्धा २०२२ नुकतीच पार पडली असून या स्पर्धेत अंदाजे ८०० कराटे खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवित कौशल्ये सादर केलीत.पूर्व विदर्भातील २९ कराटे टीमनी भाग घेत ही आयोजित स्पर्धा गाजविली.

बक्षीस वितरण प्रसंगी डॉ.दिलीप शिवरकर, डॉ.पाटील, सुश आसरा फौंडेशनच्या मुख्य संचालिका पायल कापसे, विवेक कापसे, डॉ. अजय पिसे ,डॉ. खानेकर ,डॉ .बोरकर सुशांत इंदोरकर, पूर्णिमा पाटील आदीं मान्यवर मंडळी उपस्थित होती.

शिफु विशाल इंदोरकर यांनी सूत्रसंचालन व व्यवस्थापन तर एरिया व्यवस्थापन व बाउट रेफरी पिपलायन आष्टनकर यांनी काम पाहिले. या शिवाय ऑफिसियल मधून मास्टर्स पंकज चौधरी, भोलानाथ शेंडे, आदित्य फुलझेले, विशाल बारस्कार सुदर्शन बावणे, मंगेश वाढरे, कल्याणी मुनघाटे,जागृती मरसकोल्हे, सुनील सातपैसे, समीर पठाण, राहुल गाहूकर, मयूर कुंदोजवार,गणेश चन्ने, कैलास राखडे, मानसी वाढरे, श्रद्धा साठोणे, लकी नगराळे, साहिल उपरकर, हर्षल फाये यांनी देखील काम पाहिले.

या वेळी श्याम भोवते , विनय बोढे हे कराटे प्रमुख रेफरी तर शरद चिकाटे, विनोद पुणेकर यनकन्न पवार, सतीश भडके यांनीही रेफरी म्हणून आपली उत्तमरित्या जबाबदारी सांभाळली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुश आसरा फौंडेशन च्या रागिणी गोहणे, दुर्गा धनोरे, हरिश पिसे, पूर्णिमा पाटील ,सौरभ निनावेकर, हिमांशू किरीमकर, विवेक कापसे, गीतांजली थुटे, बालु हेलवटकर आदी सुश आसरा फौंडेशन व कराटे असोसिएशनचे सदस्यांनी परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केली.