Home Breaking News Chandrapur@ city news चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

Chandrapur@ city news चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

123

Chandrapur@ city news

चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:महापरिनिर्वाण दिना निमित्त आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानिक आंबेडकर चौकातील पुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

तसेच शहरातील पठाणपूरा मुख्य मार्गावरील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक बबलु मेश्राम, बहुजन आघाडी महिला शहर संघटिका विमल काटकर, भाविक पेटकर, वैशाली मेश्राम, अनिता झाडे, निलिमा वनकर, निलिमा कोरेकर, प्रतिक शिवणकर, विलास वनकर, सायली येरणे, माधुरी निवलकर, आदींची उपस्थिती होती.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन नमन करत अभिवादन करण्यात आले.

तर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.