Home Breaking News Ghugus city @news श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे ” ग्राम सफाई अभियान ”...

Ghugus city @news श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे ” ग्राम सफाई अभियान ” सुरूच

204

Ghugus city @news
■ श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे ” ग्राम सफाई अभियान ” सुरूच

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

घुग्घुस : दि.१९ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व जेष्ठ नागरिक संघ घुग्घुस याच्या तर्फे चालु असलेल्या दर सोमवार रोजी तसेच आज १९ डिसेंबर सोमवार रोजी रमाबाई बौद्ध महिला मंडळ काॅलरी नं.२ जुनी वसाहत येथे व परिसरातील साफसफाई करण्यात आले.

यावेळी बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी म्हनाले की यंग चांदा ब्रिगेड संस्थापक,अध्यक्ष व अपक्ष आ.किशोर जोरगेवार यांच्या तर्फे साफसफाई करण्यासाठी गरजू साहित्य भेट देण्यात आले, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते.

तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकता दिपक कांबळे व तुलसी वृंदावन समाजाचे अध्यक्ष महेंद्र बाग व कार्यकारिणी आवर्जून उपस्थित साफसफाई करण्यात आले.

यावेळी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष मधुकर मालेकर, सचिव विठोबा बोबडे,उपाध्यक्ष गंगाराम बोबडे, बालाजी धोबे, शामराव कांबळे, नंदुभाऊ ठेंगणे, लक्ष्मणराव ठाकरे, वासुदेव ठाकरे, सोनबाजी बदखल, जनाबाई निमकर उपस्थित होते.