Ghugus city @ news
■ लाॅयड्स ग्राम काॅलनीत औद्योगिक किक्रेट टेनिस बाल टुर्नामेंट
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
घुग्घुस:दि. १८ डिसेंबर २०२२ रविवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत पाच (५) कंपनीकडून खेळणार किक्रेट टुर्नामेंट सुरु असून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी ली. अदानी-एसीसी सिमेंट्स लिमिटेड चंदा,
धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर ली, चमन लिमिटेड जीआर ग्रुप व
राजुरी स्टील्स यांच्यात सामना उत्साहात होणार आहे.
प्रमुख पाहुणे अदानी- एसीसी सिमेंट्स लिमिटेड कंपनीचे युनिट हेड के.आर. रेड्डी व एच.आर.हेड मा.पुष्पक चौधरी मान्यवर यांचे लाॅयड्स मेटल्स उद्योगाचे प्रमुख हेड संजयकुमार व एच.आर उपाध्यक्ष पवन मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच उपस्थित टुर्नामेंट किक्रेट स्पर्धा सुरु करण्यात आले. यावेळी पहिला सामना राजुरी स्टील्स टिम व लाॅयड्स स्टील्स टिम यांच्यात होऊन लाॅयड्स स्टील्स टिम नी बाजी मारली.
लाॅयड्स स्टील्स टिम ने पहिली फलंदाज करुन ३०४ धावा काढून २९ बालात १०४ धावा २ विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅच अंकुर पोरस यांना देण्यात आले. तसेच राजुरी स्टील्स ने १४९ धावा काढून बाजी हारण्यात आले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसह परिसरातील सर्व कर्मचारी परिसरातील कंपनीचे नागरिक उपस्थित होते.
