Home Breaking News Korpna taluka@ news सोनूर्लीत दारुचा महापूर! अवैध दारु विक्री जोमात ,...

Korpna taluka@ news सोनूर्लीत दारुचा महापूर! अवैध दारु विक्री जोमात , कोरपणा पोलिस स्टेशनला शेकडों महिला धडकल्या! ठाणेदाराला दिले निवेदन!

122

Korpna taluka@ news

■ सोनूर्लीत दारुचा महापूर!

■ अवैध दारु विक्री जोमात , कोरपणा पोलिस स्टेशनला शेकडों महिला धडकल्या!

■ठाणेदाराला दिले निवेदन!

सुवर्णभारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

कोरपना: कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावात अवैद्य दारू विक्री जोरात सुरू असून त्यांचा विपरीत परिणाम गावातील तरुण मुले ,महिला, मुलींवर होत आहेत या शिवाय गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावत असून दारूच्या व्यसन असलेल्या कुटुंबात नेहमीच झगडे भांडण होत आहेत त्यामुळे त्यांचे कुटुंबीयांतील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी याकरिता सोनुर्ली गावातील शेकडो महिला व पुरुषांनी काल कोरपणा पोलीस स्टेशनला धडक दिली.

अवैद्य दारुमुळे होत असलेल्या परिस्थितीचे कथन महिलांनी पोलिस स्टेशनला केले.आपणांस आम्ही सर्व महिला सहकार्य करण्यात तयार आहो अशी ग्वाही देत त्यांनी सोनुर्ली गावात सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करून दारू विक्रेत्यांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान ठाणेदार कोरपणा यांना एक निवेदन त्यांनी या वेळी दिले.