Home नवी दिल्ली Chandrapur dist@ news अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष वेधणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे...

Chandrapur dist@ news अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष वेधणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल आज जाहीर! विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून साजरा केला आनंदोत्सव!

241

Chandrapur dist@ news

■ अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष वेधणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल आज जाहीर!

■ विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून साजरा केला आनंदोत्सव!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विषेश प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ग्राम पंचायतसाठी रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीला आज मंगळवारला सकाळी दहा वाजता संबंधित तहसील कार्यालयात आरंभ झाला.दुपार पर्यंत बहुतेक सर्वच ग्राम पंचायतचे निकाल आज जाहीर झाले .दरम्यान काही ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी तर काही ठिकाणी सदस्य पदासाठी अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढती झाल्या होत्या ग्राम पंचायत निवडणूकीकडे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधले होते .

चंद्रपूर तालुक्यात चोरगांव ग्राम पंचायत सरपंचपदासाठी तृणाली धंदरे ,धानोरा ग्राम पंचायत सरपंचपदासाठी विजय आगरे ,दाताळा ग्राम पंचायत सरपंच पदासाठी सुनिता देशकर ,येरुर ग्राम पंचायत सरपंचपदासाठी प्रियंका मडावी तर जुनोना ग्राम पंचायत सरपंचपदासाठी विवेक शेंडे विजयी झाले.

बल्हारपूर तालुक्यातील “या पाच” ग्राम पंचायत सरपंच पदासाठी अनुक्रमे इटोली चक कवडू पिपरे ,कवडजई नितीन येलोरे, कोठारी अश्विनी वासमवार,बामणी बुधाजी अलाम,व काटवली कवडू ढूमने हे विजयी झाले.विशेष म्हणजे आज मतमोजणी परिसरात पोलिस विभागा तर्फे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .