Home Breaking News Nagpur city @news महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो घोषणांने नागपूर दणाणले...

Nagpur city @news महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो घोषणांने नागपूर दणाणले ! पोलिसांच्या रास्त मागण्यांसाठी नागपूर विधानभवनावर निघाला भव्य मोर्चा! चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे आयोजन ! प्रमोद वाघमारे व भूमेश्वर निमगडे यांनी केले मोर्चाचे नेतृत्व !

232

Nagpur city @news

■  महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो घोषणांने नागपूर दणाणले !

■ पोलिसांच्या रास्त मागण्यांसाठी नागपूर विधानभवनावर निघाला भव्य मोर्चा!

■ चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे आयोजन !

■ प्रमोद वाघमारे व भूमेश्वर निमगडे यांनी केले मोर्चाचे नेतृत्व !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

नागपुर : महाराष्ट्रातील पोलिस कुटुंबियांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेत पोलिस बाॅईज असोसिएशनचा एक सदस्य आमदार म्हणून घेण्यात यावा ,पोलिसांची ड्युटी ही आठ तासांची असावी , पोलिस विभागातील अनुकंपाची भरती त्वरित करण्यात यावी ,पोलिस बाॅईजना पोलिस भरतीत दहा टक्के आरक्षण देण्यात यावे, शहीद पोलिस शिपाई प्रकाश मेश्राम यांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा आदीं प्रमुख व रास्त मागण्यांसाठी आज मंगळवार दि.२०डिसेंबरला यशवंत स्टेडियम नागपूर येथून महाराष्ट्र राज्य पोलिस बाॅईज असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रमोद वाघमारे व विदर्भ तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूमेश्वर निमगडे यांचे नेतृत्वाखाली दुपारी १वाजता नागपूरात एक मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने काढण्यात आला .काही तासांच तो नागपूर विधान भवनावर पोहचला.पोलिस बाॅईज असोसिएशनचे शेकडों पदाधिकारी व सदस्य आजच्या भव्य मोर्चात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणांने नागपूरचा परिसर अक्षरशा दणाणला होता.नंतर एका शिष्टमंडळाने मागण्यांचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले असल्याचे भूमेश्वर निमगडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.