Home Breaking News Chandrapur city@ news पीण्याच्या पाण्यासाठी अखेर राहुल देवतळेंचे आज पासून साखळी...

Chandrapur city@ news पीण्याच्या पाण्यासाठी अखेर राहुल देवतळेंचे आज पासून साखळी उपोषण आरंभ! मनपा परिसरात बसले उपोषणाला!

202

Chandrapur city@ news

■ पीण्याच्या पाण्यासाठी अखेर राहुल देवतळेंचे आज पासून साखळी उपोषण आरंभ!

■ मनपा परिसरात बसले उपोषणाला!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:चन्द्रपूर शहरातील प्रामुख्याने विठ्ठल मंदीर प्रभागातील गोपाल पुरी येथील आनंदनगर, बापूजी नगर निंबाळकर वाडी , बजरंग चौक बालाजी वार्ड दानव वाडी,टंडन लेआऊट आदीं भागातील पाणी पुरवठा नियमीत करण्यासाठी आज बुधवार दि.२१डिसेंबर पासून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी महानगरपालिका परिसरात साखळी उपोषण सुरु केले आहे.दरम्यान आमच्या प्रतिनिधी आज सकाळी त्यांची भेट घेतली असता देवतळे म्हणाले कि या मागणी संदर्भात आपण अनेकदा मनपाला लेखी निवेदन दिले. पण मनपा प्रशासनाला जाग आली नाही.त्यामुळे शेवटी साखळी उपोषण सारखा निर्णय आपल्याला घ्यावा लागला .

चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे शहराला पाणीपुरवठा केला जातो.तो पुरवठा निव्वळ १८२दिवस केला जातो.परंतू मनपा जनतेकडून तो कर ३६५दिवसांचा घेतला जातो हे योग्य आहे का असा सवाल देखिल देवतळे यांनी आज केला आहे. जो पर्यंत जनतेची लूट थांबणार नाही तो हे उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार राहूल देवतळे यांनी केला आहे. त्यांचे या साखळी उपोषणाला सर्वस्तरावरुन पाठिंबा मिळत आहे.उपरोक्त मागणीसाठी शहरात देवतळे यांनी सर्वप्रथम पाऊल उचलले हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.