Home Breaking News Chandrapur dist@ news कन्हान क्रांद्रींची प्रख्यात मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे झाली...

Chandrapur dist@ news कन्हान क्रांद्रींची प्रख्यात मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे झाली “भारत गौरव” पुरस्काराने सन्मानित ! सरोदेंना या पूर्वी देखील प्राप्त झाले अनेक पुरस्कार!

343

Chandrapur dist@ news

■ कन्हान क्रांद्रींची प्रख्यात मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे झाली “भारत गौरव” पुरस्काराने सन्मानित !

■ सरोदेंना या पूर्वी देखील प्राप्त झाले अनेक पुरस्कार!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:जागतीक मानवाधिकार दिना निमित्ताने “भारत गौरव पुरस्कार” ‘अवॉर्ड शो’ नागपूरच्या सुरेश भट्ट सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.
सदरहु पुरस्कार कार्यक्रम जागतिक महिला हक्क, भारत गौरव फाऊंडेशन, अजय मेश्राम ,जन्मभूमी टाइम्सचे संपादक सुरेंद्र गजभिये, ब्रजेश डहरवाल, व मोहन शिंदे यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.
या अवॉर्ड शोमध्ये कांद्री- कन्हान गावातील मुळ रहिवाशी असलेल्या बॉलीवूड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कु. कल्याणी सरोदेला भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कल्याणी सरोदे‌‌ला चित्रपट मालिकेतील कामासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार देखिल या पूर्वी मिळाला होता.एका छोट्या गावातीतील ती रहिवाशी असून फिल्म उद्योग क्षेत्रात तीने आपली आगळीवेगळी छाप सोडली आहे . कल्याणीने फिल्म जगत मधील अनेक कलाकरांचा आजपावेतो (सेलिब्रिटींचा)सुंदर व सुरेख मेकअप केला आहे.
सोनू सूद, जस्मिन भसीन, प्रार्थना बेहेरे, राहुल वैद्य, राखी सावंत, आजमा फाला, रोशनी कपूर, रुपाली गांगुली, गोल्डन बॉईज यांच्याकडून‌ कुमारी कल्याणीला बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहे. सनी, कार्तिकी गायकवाड, अदा‌ खान, हिना खान, रोशनी कपूर, आसनूर कोरली, गोनी शिवांगी, जोशी सोनवणे यांच्या हस्ते देखील कल्याणीने या अगोदर पुरस्कार स्विकारले आहे. कला क्षेत्रात नेहमीच त्यांनी आपली वेगळी प्रतिभा दाखवली आहे.
‌‌
आयोजित कार्यक्रमाला राजा मुधोजी भोसले, वेदप्रकाश ओजा ,भारताचे आयुर्वेदिक स्वदेशी अध्यक्ष जगातील सर्वात तरुण महिला ज्योती अंबे, बुद्ध धम्म प्रचारक गगन मलिक, नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य,अभिनेता विकास महाजन, मशीन खान आदीं मान्यवर या वेळी उपस्थित होते.