Home Breaking News Chandrapur dist@ news चंद्रपूरात उद्या रविवारी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने...

Chandrapur dist@ news चंद्रपूरात उद्या रविवारी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भव्य स्री मुक्ती परिषद !

268

Chandrapur dist@ news

चंद्रपूरात उद्या रविवारी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भव्य स्री मुक्ती परिषद !

सुवर्ण भारत::किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर :वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने उद्या रविवारी दि.२५डिसेंबरला सकाळी ११वाजता भव्य स्त्री मुक्ती परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.ही परिषद चंद्रपूर शहरातील स्थानिक जटपूरा गेट जवळील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित करण्यात आली असल्याचे आयोजकांनी एका प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.या परिषदेला मार्गदर्शक म्हणून आंबेडकर चळवळीचे भाष्यकार भास्कर भोजने , महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बन्सोडे , राज्य सदस्य कुशलभाऊ मेश्राम, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर , महिला जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकार , जिल्हाध्यक्ष भुषण फुसे,पुराणीक गोंगले ,बंडु ढेंगरे ,बंडु नगराळे, लताताई साव ,निशा ढेंगरे , अधिवक्ता श्रद्धा गोवर्धन,व सुजाता लाटकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तनुजा रायपूरे ह्या विभुषित करणार आहे तर कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या चैताली रामटेके यांचे हस्ते होणार आहे. आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मोनाली पाटील,सुलभा चांदेकर,संध्या मेश्राम, व ऋचा लोणारे यांनी केले आहे.