Home Breaking News Chandrapur dist@ news वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी – रामपूर येथील घटना

Chandrapur dist@ news वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी – रामपूर येथील घटना

240

Chandrapur dist@ news

■ वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी – रामपूर येथील घटना

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:आज शनिवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मौजा नेरी येथील एक महिला शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणी करीत असताना नेरी पासून दोन कि.मी .अंतरावर असलेल्या रामपूर बस स्टॉप जवळून अवघ्या अर्धा कि.मी .अंतरावर असलेल्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून तीला जखमी केल्याची घटना घडली.

सोबत असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा करताच वाघ घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव रीना हरिचंद्र जांभुळे आहे. तिचे वय 30 वर्षाचे असून ती नेरी येथील मूळ रहिवाशी आहे जखमी महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे दाखल करण्यात आले असून जखमी महिलेवर डॉक्टर डांगे यांनी उपचार करीत आहे.

सदरहु घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी रासेकर घटनास्थळी पोहचले असल्याचे ‌वृत्त असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असल्याचे समजते.वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

आजच्या या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे . जखमी महिलेला उपचाराकरिता आर्थिक मदत मिळावी अशी मागणी येथील जनतेंनी केली आहे.