Home Breaking News Chandrapur dist@ news आ.जयंत पाटील यांचेवरील निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घ्या!...

Chandrapur dist@ news आ.जयंत पाटील यांचेवरील निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घ्या! चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडों कार्यकर्ते उतरले रस्त्यावर ! जनता काॅलेज जवळील चौकात जोरदार घोषणाबाजी देत केले “त्यांनी”रस्ता रोको आंदोलन!

286

Chandrapur dist@ news

■ आ.जयंत पाटील यांचेवरील निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घ्या!

■ चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडों कार्यकर्ते उतरले रस्त्यावर !

■ जनता काॅलेज जवळील चौकात जोरदार घोषणाबाजी देत केले “त्यांनी”रस्ता रोको आंदोलन!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री जयंत पाटील यांचेवर काल गुरुवारी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.हिवाळी अधिवेशनात आपला बुलंद आवाज उठविणारे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन त्वरीत मागे घ्या या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडों कार्यकर्ते आज शुक्रवारी दुपारी रस्त्यावर उतरले .

त्यांनी स्थानिक जनता काॅलेज जवळील एका चौकात घोषणाबाजी करीत काही तास रस्ता रोको आंदोलन केले . या आंदोलनाची माहिती होताच कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चंद्रपूर पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले.

आंदोलन दरम्यान शिंदे -फडणवीस सरकारचा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध केला.सदरहु आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजीव कक्कड ,नितिन भटारकर, सुनिल काळे,डि.के .आरीकर, राहुल देवतळे , संभाजी खेवले ,अभिनव देशपांडे,कुमार पाल , सतिश मांडवकर ,व शेकडों कार्यकर्ते सहभागी झाले होते.